Thursday , May 28 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर विश्वभर सेवा समिती संस्थेचे संचालक एस एम साखरकर यांनी प्रास्ताविक केले. नंतर कॉलेजच्या डाॅ. स्मिता मुतगेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून स्वागत केले. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे उपाध्यक्ष नेताजीराव कटांबळे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन व ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले. नंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथसंंचालन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तदनंतर महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानवर फिरवून पाहुण्यांच्या हस्ते सुपूर्द केली. यानंतर यशोदा धामणेकर यानी खेळामध्ये खेळाडू वृत्तीचे शपथ विद्यार्थ्यांना दिली. नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राऊंड टेबल क्लबचे सदस्य सागर झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायामासोबत खेळ ही खूप महत्त्वाचे आहेत. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही त्यांनी दिल्या. यानंतर राऊंड टेबल क्लबचे अध्यक्ष अक्षय ओडूगौडार यांनी, शरीर आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नेहमी सकाळी लवकर उठून चालले पाहिजेत, योगा केला पाहिजेत, व फास्ट फूड जंक फूड पासून दूर राहिले पाहिजेत व ते खाऊ नये. असे त्यांनी सांगितले व मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पी जे घाडी यांनी विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यासाठी मोलाचे सहकार्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक देवकुमार मंगनाकर यांचे लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी व आभार प्रदर्शन धनश्री गाडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *