Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू

  मेंढेगाळी गावचा रहिवासी भांबार्डी परिसरात घडली दुर्दैवी घटना खानापूर : भांबार्डी (ता. खानापूर) गावाजवळील शेतातील आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७ मे) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळगाव मेंढेगाळी, ता. खानापूर; सध्या रा. शिवणे, पुणे) …

Read More »

बेळगाव – धारवाड थेट रेल्वे मार्गासंदर्भात गर्लगुंजी परिसरातील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  खानापूर : केआयएडीबीने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी केआयएडीबी ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता, नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला. अनेकवेळा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करून वापस पाठविले, मात्र रेल्वे अधिकारी थोडीशी जमीन घेतली जाणार म्हणून सांगत असतानाच आता फक्त बेळगाव जिल्ह्यातून 1200 एकर जमीन अधिग्रहित केली …

Read More »

बंगळुरसह राज्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये भव्य मॉकड्रिल

  युद्धजन्य आणीबाणी परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये जागृती बंगळूर : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक होत असताना, या युद्ध परिस्थितीसाठी नागरिकांची आपत्कालीन तयारी तपासण्यासाठी बंगळुर शहरासह राज्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण आणि अग्निशमन सेवांकडून भव्य मॉकड्रिल करण्यात आले. युध्दजन्य आणीबाणी परिस्थितीत नागरिकांचे कर्तव्य, जबाबदारी आणि सावधगिरी याबाबतची …

Read More »

सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याचे जशास तसे उत्तर; १० पाकिस्तानी जवान ठार

  नवी दिल्ली : भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानच्या सैन्याने आता सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्यामध्ये १० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये देखील १० पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी …

Read More »

हिटमॅन रोहित शर्माची अचानक कसोटीमधून निवृत्ती

  मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करत मोठा धक्का दिला. हिटमॅन …

Read More »

कांद्याचे दर गडगडले : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

  बेळगाव : काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत होती, मात्र आता त्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा विक्रीसाठी एपीएमसीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दर इतका घसरला आहे की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून येत नाही. बेळगावसह महाराष्ट्रातील कांदा थेट बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये येतो आहे. …

Read More »

नागपूर येथील दीक्षांत समारंभात; डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांना पदवी बहाल

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून ७ सुवर्णपदके मिळवत एम‌. डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी पूर्ण केली. त्यानंतर वर्धा-नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनएमसी) येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले. पदव्युत्तर दिक्षांत समारंभात एएफएमसीच्या व्हाइस एडमिरल डॉ. …

Read More »

निपाणीत १४ पासून खासदार चषक टॉप स्टार प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे बुधवारपासून (ता. १४) २ लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे असणाऱ्या ‘खासदार चषक’ टॉप स्टार प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बुडा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आले लक्ष्मण चिंगळे …

Read More »

मसूद अजहरचे आख्खे कुटुंब संपले, भाऊ, बहिणीसह 14 जणांना यमसदनी धाडले!

  नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्याने अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद समोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती मिळाली आली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात देशाचा …

Read More »

बेकायदेशीर खाणकाम : माजी मंत्री आमदार जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांची शिक्षा

  सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल बंगळूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओबळापुरम मायनिंग कंपनी (ओएमसी) च्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री आणि गंगावतीचे विद्यमान आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ओएमसी बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात युक्तिवाद ऐकणाऱ्या हैदराबाद सीबीआय न्यायालयाने आजसाठी निकाल राखून …

Read More »