निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे बुधवारपासून (ता. १४) २ लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे असणाऱ्या ‘खासदार चषक’ टॉप स्टार प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बुडा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आले
लक्ष्मण चिंगळे यांनी, मंत्री सतीश जारखीहोळी यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार, धार्मिक क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. निपाणीत भरविल्या जाणाऱ्या या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमुळे शहर आणि परिसरातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. यापूर्वी टॉप स्टार क्लबने दिग्गज खेळाडूंना निमंत्रण देऊन स्पर्धा भरवल्या. त्यामध्ये आता आणखीन भर पडणार आहे. क्लबने ‘खासदार चषक’ आयोजीत केले असून क्लबसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित टॉप स्टार प्रिमियर लिग-२०२५ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या उपस्थितीतहोणार आहे. यास्पर्धा निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील क्रिकेट संघांसाठी मर्यादित असणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे १ लाख रूपये, ५० हजार आणि १५ हजारांची बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ दि सेरीज, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
यावेळी अब्बास फरास, जावेद कोल्हापूरे, दिपक घाटगे, राजू नाईक, महेश कांबळे, फिरोज मुल्ला, नंदकुमार कांबळे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.