Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनतर्फे दिव्यांग जलतरण प्रशिक्षणार्थींना अल्पोपहाराचे आयोजन

  बेळगाव : जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेचे ज्येष्ठ सभासद कैलासवासी तात्या रामचंद्र पवार यांचे चिरंजीव कैलासवासी चंद्रकांत पवार व नात कैलासवासी अवंती पवार यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलांसाठी जलतरण शिबिराचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी नाष्ट्याची सोय केलेली होती. संघटनेचे माजी संचालक श्री. विश्वास पवार यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने …

Read More »

कुमारस्वामींच्या फार्महाऊसचे अतिक्रमण हटवण्याची तयारी

  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बंगळूर : केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर यापूर्वी रामनगरातील बिडदी येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण हटवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभाग आता अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करत आहे. महसूल विभाग अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करत आहे. राज्य सरकारने एखाद्या …

Read More »

मुस्लिमांना सरकारी कंत्राटामध्ये आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर

  बंगळूर : सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आणि मागासवर्गीयांना वस्तू आणि सेवांमध्ये आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, सार्वजनिक वस्तू आणि सरकारी कंत्राटांमध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आज विधानसभेत विधेयक …

Read More »

उद्योजक गोविंद टक्केकर यांच्याकडून श्री चांगळेश्वरी हायस्कूलला प्रोजेक्टर भेट

  बेळगाव : सुळगा येथील उद्योजक व प्रसिद्ध समाजसेवक श्री. गोविंद टक्केकर यांनी आजच्या आधुनिक युगात शिकण्यासाठी व शिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञान युक्त शिक्षण मिळावे यासाठी श्री चांगळेश्वरी हायस्कूलला एक प्रोजेक्ट भेट दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, धैर्य ठेवून अभ्यास करा प्रामाणिकपणे केलेला अभ्यास तुम्हाला …

Read More »

धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा एनएसएस राज्य पुरस्कार

  बंगळुरू : राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कार्यासाठी गोगटे वाणिज्य महाविद्यालय, टिळकवाडी, बेळगाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या स्वयंसेविका धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २०२२-२३ या वर्षासाठी दिला गेला असून, त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांची राज्यातील सर्वोत्तम …

Read More »

फुलांची रंगपंचमी उत्साहात साजरी

  बेळगाव : शहापूर येथे दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी निमित्त कै. नारायणराव गुंडोजीराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने फुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय शिमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा समितीचे शुभम शेळके, अमृत भाकोजी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे …

Read More »

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अखेर ‘ग्रह’वापसी

  नवी दिल्ली : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आज पहाटे ग्रहवापसी झाली आहे. अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या होत्या मात्र तब्बल नऊ महिने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून पडल्या होत्या. आज पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी प्लोरिडाच्या किनारपट्टीवर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं यशस्वी लँडिंग झाले आहे. सुनीता …

Read More »

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.दयानंद बांदोडकर (भाऊ) यांची ११४ वी जयंती साजरी…

  पणजी : श्रीमती हायस्कूल वेळगे-गोवा येथे गोव्याचे भाग्यविधाते, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि बालकृष्ण बांदोडकर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. श्री. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पणजी येथील जुन्या सचिवालयात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने …

Read More »

गुड्डादेवी मंदिराजवळ झाली पिण्याच्या पाण्याची सोय

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील जागृत देवस्थान गुड्डादेवी ही जागृत देवी असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते अगसगे, चलवेनहट्टी, मण्णुर,गोजगे, बेक्कीनकरे, अतिवाड अशी पंचक्रोशीच्या सीमेवर वसलेल्या या देवीला आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी दर मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातून‌ दोन दिवस भाविक याठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात …

Read More »

साधना क्रीडा संघाच्या वतीने नूतन महापौर श्री. मंगेश पवार यांचा सत्कार

  बेळगाव : नुकताच पार पडलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीमध्ये श्री. मंगेश पवार यांची महापौर पदी निवड झाली. या निमित्ताने साधना क्रीडा केंद्र संघाच्यावतीने अभिनंदन करून, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा केंद्र संघाच्या वतीने होणाऱ्या 18, 19 व 20 एप्रिल 2025 मध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन …

Read More »