Sunday , July 26 2026
Breaking News

फुलांची रंगपंचमी उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथे दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी निमित्त कै. नारायणराव गुंडोजीराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने फुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय शिमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा समितीचे शुभम शेळके, अमृत भाकोजी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक श्री. नेताजीराव जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. श्री. शुभम शेळके यांनी राजस्थानमध्ये साजरी केली जाणारी फुलांची रंगपंचमी बेळगावात साजरी करणाऱ्या ट्रस्टचे अभिनंदन केले, आपले सर्व सण शांततेत पार पाडावेत असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी बोलताना श्री. मालोजी अष्टेकर यांनी कै. नारायणराव जाधव ट्रस्टने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती सांगितली फुलांची रंगपंचमी आयोजित करून प्रदूषण मुक्त रंगपंचमी कशी साजरी करतात याचा आदर्श पाठ ट्रस्टने घालून दिला आहे असे ते म्हणाले. आपल्या भारतात सर्व सणामागे कोणता ना कोणता विशिष्ट उद्देश आहे त्याचे पालन करून सर्व समाजातील सण शांततेत त आणि उत्साहात साजरे करून आपल्या देशाची आणि धर्माची शान वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात श्री. संजय शिंदे व यल्लाप्पा कोलकार यांनी विचार मांडले. कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलाब पुष्प देऊन श्री. नेताजीराव जाधव, बापू जाधव, विजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर उपस्थितांनी फुले उधळून आनंदात रंगपंचमी पार पाडली.

यावेळी दिलीप दळवी, प्रभाकर भाकोजी, अशोक चिंडक, यल्लाप्पा कोळकर, दयानंद जाधव, परशराम घाडी, युवराज जाधव, साईराज जाधव, सतीश शिंदे, यशवंत देसाई, शंकर केसरकर, सुभाष शिनोळकर, हिरालाल चव्हाण, प्रदीप शेट्टीबाचे, यल्लाप्पा नागोजीचे, दशरथ शिंदे, तानाजी चव्हाण, राजाराम सूर्यवंशी, बंडू बामणे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *