Sunday , July 26 2026
Breaking News

धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा एनएसएस राज्य पुरस्कार

Spread the love

 

बंगळुरू : राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कार्यासाठी गोगटे वाणिज्य महाविद्यालय, टिळकवाडी, बेळगाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या स्वयंसेविका धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २०२२-२३ या वर्षासाठी दिला गेला असून, त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांची राज्यातील सर्वोत्तम महिला स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या युवा सशक्तीकरण आणि क्रीडा विभागाने हा पुरस्कार दिला.

धनश्री यांना कर्नाटकचे माननीय राज्यपाल श्री. थावरचंद गहलोत आणि कर्नाटक राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. गोविंदराजू यांच्या हस्ते १७ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेळगाव येथील हॉकीपटू आणि रिटायर्ड ऑनरी कॅप्टन श्री. उत्तम शिंदे यांची त्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *