Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान : दवाखान्यावर छापा; डॉक्टर महिलेसह तिघांना अटक

  कोल्हापूर : कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटल मधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगे पाडळी येथून अटक केली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गर्भलिंग निदान …

Read More »

शिक्षण क्षेत्रावर चहूबाजूंनी हल्ले व्यापक चळवळीची नितांत गरज : प्रा. आनंद मेणसे

  गडहिंग्लज : शिक्षण क्षेत्रावर चहू बाजूने हल्ले होत असून आपण जर असेच गप्प राहिलो तर नजीकच्या काळात शिक्षण घेणे ही केवळ श्रीमंत लोकांसाठी राखीव गोष्ट राहील आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहतील अशी भीती प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केली. ते गडिंग्लज येथील शारदा …

Read More »

बोडकेनट्टीत १६ रोजी गिरणी कामगारांची बैठक

  बेळगाव : एकेकाळी मुंबईचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड गिरण्या मुंबईत मोठ्या प्रमाणात गिरण्या चालत होत्या जवळपास पाच पिढ्यानी गिरणीत काम केले आणी याच गिरण्यात आपल्या सीमाभागातील म्हणजे बेळगावच्या कामगाराची संख्या सुध्दा मोठी होती. मुळात गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले त्यामुळे मुंबई एक आधुनिक विकसित शहर झाले महाराष्ट्र …

Read More »

राज्यपालांनी मायक्रो फायनान्स अध्यादेशावर केली स्वाक्षरी

  अधिवेशनात विधेयकावर चर्चा करण्याची सूचना बंगळूर : एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सूक्ष्म वित्तपुरवठादारांचा छळ रोखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आणलेल्या मायक्रो फायनान्स अध्यादेशावर अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत आणि राज्यपालांनी अधिवेशनात यावर चर्चा करावी असेही सुचवले आहे. यापूर्वीही, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य …

Read More »

फासेपारध्यांच्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीला कागलजवळ अटक

  निपाणी पोलिसांची कारवाई : कोगनोळीतील दरोड्याचा उलगडा; ८ तोळे सोन्यासह १० लाखांचा मुद्देमाल; म्होरक्या फरार निपाणी : विविध चोरीच्या गुन्ह्यात कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यासह चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी वाॅण्टेड असलेल्या आंतरराज्य फासेपारधी दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान या टोळीकडून ८ जानेवारी २०२३ रोजी कोगनोळी …

Read More »

भारताचा १४२ धावांनी ‘विराट’ विजय! इंग्लंडचा ३-० ने व्हाईटवॉश

  अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव २१४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १४२ …

Read More »

श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर भाविकांसाठी पुरेपूर व्यवस्था : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  तिरुपती, धर्मस्थळ धर्तीवर विकासाची योजना बेळगाव : सौंदत्ती येथील श्री क्षेत्र रेणुका यल्लम्मा देवीच्या उत्सवात भरत पौर्णिमेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. एका दिवसात सुमारे लाखो भाविक मंदिराला भेट देत आहेत. भाविकांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेऊन पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश आणि …

Read More »

मुलांमध्ये सुसंस्कार घडविण्यासाठी पालकांना साने गुरुजींच्या “शामच्या आईची” भूमिका निभवावी लागेल : सौ. सुजाता छत्रू पाटील

  रणझुझांर शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बेळगाव : विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे अनुष्ठान होणे गरजेचे आहे. त्याकरिता पालकांनी आपल्या पाल्यांचे अति लाड पुरवण्यापेक्षा त्यांच्या लहानात लहान चुकीकडे लक्ष घालने व त्यांना चुकांपासून परावृत्त करण्यासाठी पालकांनी श्यामची आई होणे ही आजच्या …

Read More »

मॉडेल शाळा येळ्ळूर येथे केंद्र पातळीवरील शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) उत्साहात पार

  येळ्ळूर : इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांच्या मजबुतीसाठी शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) सर्व सरकारी शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यास मदत करतो. विशेष करून जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागासलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव शिक्षणामध्ये आवड निर्माण करण्यास महत्त्वाचा …

Read More »

केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त 18, 19 फेब्रुवारी रोजी बेळगावात

  बेळगाव : केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त येत्या 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांच्या सुरक्षा उपायांचे मूल्यमापन करण्यासाठी येणार आहेत असे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यासोबत ते मराठी शाळा आणि विविध संघटनेच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. या भेटीची कल्पना देणारी पत्रे त्यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र …

Read More »