बेळगाव : केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त येत्या 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांच्या सुरक्षा उपायांचे मूल्यमापन करण्यासाठी येणार आहेत असे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यासोबत ते मराठी शाळा आणि विविध संघटनेच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.
या भेटीची कल्पना देणारी पत्रे त्यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला सुद्धा पाठविली आहेत.