Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न

बेळगाव : कॅपिटल ही संस्था अर्थकारणाशी निगडित असून आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. संस्था गेली सतरा वर्षे सातत्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन यशस्वीपणे करीत असून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शंकांचे निरसन …

Read More »

हलशीवाडी युवा स्पोर्ट्सच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

    खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील …

Read More »

खडेबाजार पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक

    बेळगाव : बेळगाव खडेबाजार पोलिसांनी खतरनाक दुचाकी चोराला अटक केली असून अबुबकर सिकंदर सनदी (वय २२) रुक्मिणी नगर जनता प्लॉट नववा क्रॉस नवाना सध्या रा. श्रीनगर गार्डन जवळ झोपडपट्टीत असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून बेळगावच्या विविध भागातून चोरीला गेलेल्या एकूण रु. 3.45,000 किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या …

Read More »

दूधगंगा नदीत भल्या मोठ्या मगरींचे दर्शन

  चिककोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदी पात्रात दोन महाकाय मगर तसेच मगरीची पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना पूर आला होता. दिवसाढवळ्या नदीकाठी मगरी दिसू लागल्या. एकसंबा शहरातील शेतकरी विश्वनाथ कागे म्हणाले की, एकसंबा शहरातील दूधगंगा …

Read More »

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा ‘उदय’?

  संजय राऊतांचा गौप्यस्फोट मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल’ असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले, ‘एकनाथ शिंदे, अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न’ असे …

Read More »

जीवन संघर्ष फाउंडेशनतर्फे 25 रोजी राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन

  बेळगाव : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव व एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्यातर्फे येत्या शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव -2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे हे संमेलन …

Read More »

कै. वामनराव मोदगेकर एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेला सुरुवात

  बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्था निलजी संचालित रणझुंझार हायस्कूल निलजीमध्ये रणझुंझार शिक्षण संस्था व रणझुंझार को.ऑप.क्रे. सोसायटी निलजी यांच्या सौजन्याने कै. वामनराव मोदगेकर स्मृती निमित्त एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार मल्टी पर्पज को. ऑप.क्रे. सोसायटीचे चेअरमन तसेच कै. वामनराव मोदगेकर यांचे सुपुत्र रमेशराव वा.मोदगेकर हे होते. …

Read More »

आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात येत आहे? अस्तित्वात नसेल तर नाल्याची निर्मिती करू नका असा आदेश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी 1 जानेवारी रोजी स्वतः नाल्याची पाहणी करून बजावला होता. तरी देखील वॉर्ड क्र. 50 च्या लोकप्रतिनिधींनी काही मोजक्याच लोकांना हाताशी धरून …

Read More »

“उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” संजीवीनी फौंडेशनच्या वतीने प्रा. युवराज पाटील, कोल्हापूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मुतगा निलजी बसरीकट्टी सांबरा बाळेकुंद्री गावातील दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिश स्कुल मुतगे येथे होणार आहे. आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने प्रसिद्ध …

Read More »

काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : काँग्रेस अधिवेशनातर्फे येत्या मंगळवार दि. 21 रोजी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यांना पर्यायी मार्गाची सूचना करण्यात आली आहे असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी …

Read More »