Sunday , June 7 2026
Breaking News

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा ‘उदय’?

Spread the love

 

संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल’ असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले, ‘एकनाथ शिंदे, अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न’ असे म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. भाजपला राज्यात एकहाती सत्ता पाहिजे असे म्हणताना त्यांनी याची सुरुवात ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून’ होणार असल्याचं म्हणत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.

भाजपच्या याच भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांनीसुद्धा स्पष्ट प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा ‘उदय’ समोर येईल. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. ही माहिती माझी… 20 आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते तेव्हाच हा ‘उदय’ होणार होता किंबहुना तेव्हाच हा ‘उदय’ करण्याचे निश्चित झाले होते. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची… हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे’, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *