Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल स्कूल जवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हौसूर आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात …

Read More »

उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणी नवा ट्विस्ट!

  बेळगाव : बेळगावच्या संतोष पद्मन्नावर या उद्योजकाच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनव्या खळबळजनक बातम्या उघडकीस येत असून संतोष पद्मन्नावर हा वासनांध होता आणि त्याच सवयीमुळे पत्नीने त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या खूनप्रकरणी पत्नी उमा पद्मन्नावरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले खरे. परंतु यामागे असलेल्या कारणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. …

Read More »

म्हादई योजना १५ दिवसांत लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

  बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, नरगुंद महिला संघर्ष राज्य समितीच्या वतीने म्हादई योजना राबविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज अभिनव आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी कळसा भांडुरा प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी बेळगावच्या कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करण्यात आले. उत्तर …

Read More »

मुलींना आश्रमात बंदी बनविण्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

  नवी दिल्ली : ‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर आश्रमात दोन बहि‍णींना बळजबरीने डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना आश्रमाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. या कारवाईनंतर ‘ईशा फाऊंडेशन’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याविरोधात याचिका दाखल …

Read More »

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर तर उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार यांची निवड

  कार्यवाहपदी महेश काशिद, सहकार्यवाहपदी परशराम पालकर बेळगाव : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद तर सहकार्यवाहपदी परशराम पालकर यांची बिनविरोध निवड झाली. कुलकर्णी गल्ली येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. मावळते अध्यक्ष विलास अध्यापक अध्यक्षस्थानी होते. मावळते कार्यवाह …

Read More »

गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन

  बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा कार्यक्रम केंद्रात आयोजित केला आहे, अशी माहिती गणेश दूध केंद्राचे संचालक प्रवीण ऊर्फ उमेश देसाई यांनी दिली. गणेश दूध अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस आले आहे. १० …

Read More »

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तयारीबाबत घेतला आढावा

  कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती …

Read More »

भामट्याने लांबवली वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ढोर गल्ली वडगाव येथे बुधवारी दुपारी ३.४२ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सदर भामटा घरात शिरला त्यावेळी त्या घरात फक्त दोन वृद्ध महिला …

Read More »

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू

  हुक्केरी : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील नेगिनहाळ गावात ही दुर्दैवी घटना घडली. सुरेश बडिगेर (वय ५३) आणि जयश्री बडिगेर (वय ४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. घटप्रभा नदीवरील पूल ओलांडत असताना दुचाकी पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त …

Read More »

कंटेनर – दुचाकीचा भीषण अपघात : विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील आमटे गावाजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव निखिल बाबागौडा पाटील (१९) असे असून तो चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील रहिवासी आहे. बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. आणखी एक विद्यार्थी मुडलगी येथील …

Read More »