Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावचे स्केटर्स चमकले; पाच पदकांची कमाई

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 54व्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय स्केटिंग स्पर्धा तसेच सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावचा झेंडा उंचावला आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे 700 हून अधिक टॉप स्केटर्सनी विविध राज्यांतून सहभाग घेतला होता. पाँडिचेरी व केरळ येथे पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये बेळगावच्या …

Read More »

हेमाडगा शाळेत साजरा झाला “आजींच्या मायेचा सोहळा”

  खानापूर : भीमगड अभयारण्यातील हेमाडगा सरकारी शाळेत ‘आजींच्या मायेचा सोहळा’ हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आजी-नातवंडांच्या प्रेमळ नात्याला सन्मान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन हा सोहळा संस्मरणीय केला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताच्या गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा फुल देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख …

Read More »

श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवा निमित्त श्री चिदंबर देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सव सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी असून निमित्त चिदंबर नगर येथील श्री चिदंबर देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ९ रोजी सकाळी लघुरुद्राभिषेक आणि श्री मल्हारी होम इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी तीन वाजता गोवावेस येथील श्री राजाराम मंदिर पासून दिंडीयात्रा …

Read More »

निपाणी परिसरात गोरज मुहूर्तावर उडाला तुळशी विवाहचा बार

  भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तुळशी विवाहाची प्रतीक्षा केली. अखेर सोमवारी (ता.३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोबाईल वरील मंगलाष्टीकेवर निपाणी आणि परिसरात तुळशी विवाहाचा बार उडवून दिला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजलया पासून घरोघरी महिलांची तयारी …

Read More »

बसुर्ते गावातील धरण विस्थापितांच्या मागण्या पूर्ण करणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

  बेळगाव : बसुर्ते गावच्या ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्या लोकांची जमीन धरण प्रकल्पात गेली आहे त्यांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन किंवा नुकसान भरपाईची योग्य ती रक्कम मिळाल्याशिवाय धरणाचे काम करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि …

Read More »

सुळेगाली गावातील हत्तींच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांचे चौकशीचे आदेश

  खानापूर : खानापूर तालुक्यातील सुळेगाली गावात विद्युतभारित विजेच्या तारांचा शॉक लागून दोन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वनविभाग आणि वीज वितरण संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले असून कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून या घटनेची सखोल चौकशी करून …

Read More »

प्रतिटन ३५०० रुपये दरासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

  बेळगाव : उसाला प्रतिटन 3,500 रुपये इतका आधारभूत दर मिळेपर्यंत सुरू असलेल्या लढ्याला आपला संपूर्ण पाठिंबा राहील, असे भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी स्पष्ट केले. आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी साखर कारखान्यांवर टीका करताना म्हटले की, ऊस नियंत्रण मंडळासाठी बनवलेले कायदे हे ‘दात …

Read More »

खानापूर तहसीलदारांच्या तात्काळ बदलीचा उच्च न्यायालयाकडून आदेश

  खानापूर : खानापूर तहसीलदार दुंडप्पा कोमार यांना एका आठवड्याच्या आत खानापूर तहसीलदार पदावरून मुक्त करावे आणि त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांची नियुक्ती करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. एस. जी. पंडित आणि न्या. गीता के. बी. यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील विभागीय खंडपीठातून महसूल विभागाच्या सचिवांना यासंदर्भात …

Read More »

बस आणि टिप्परची समोरासमोर भीषण धडक; 19 जणांचा मृत्यू

  हैदराबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवेल्लाजवळ राज्य परिवहन …

Read More »

गनिमी काव्याने नगरपालिकेवर नवीन ध्वज फडकणारच

  स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर …

Read More »