Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

अरिहंत संस्थेच्या कुर्ली शाखेचा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत को. ऑप क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या कुर्ली शाखेच्या वर्धापन दिन कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. यावेळी महालक्ष्मी व सरस्वती पूजा पार पडली. साहिल माळी व सौरभ तुकाराम कांबळे यांची सैन्यदलात निवड झाली आहे. बळगाव मधील राणी चन्नमा युनिव्हर्सिटी येथे राजश्री विठ्ठल …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.

Read More »

बेळगाव महापालिकेला आणखी एक धक्का; मूळ मालकाला जमीन परत

    खंजर गल्ली – जलगार गल्लीतील खाजगी जमिनीवर रस्ता बांधकामाचे प्रकरण बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या हद्दीत खासगी जमिनीवर बांधलेला रस्ता मोकळा करून मूळ मालकाला परत केल्याची आणखी एक घटना घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वी बेळगावमधील खंजर गल्ली-जालगार गल्ली येथे मकबूल आगा यांच्या मालकीच्या ८०० चौरस फूट जागेवर रस्ता तयार करण्यात …

Read More »

राज्य सरकारने सीबीआयच्या खुल्या चौकशीची परवानगी घेतली मागे

  आता राज्यात प्रवेशासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील मुडा भूखंड घोटाळा, वाल्मिकी महामंडळ निधीचा गैरवापर अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या राज्य सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या हातातून सुटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या हद्दीत तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिलेली खुली परवानगी राज्य सरकारने …

Read More »

मंत्रिमंडळातील सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी

  मंत्री, कायदेतज्ञांशी सविस्तर चर्चा; उच्च न्यायालयात आव्हान देणार बंगळूर : मुडा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची योजना आखत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कायदेतज्ज्ञ आणि काही मंत्र्यांशी पुढील कायदेशीर निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्र्याच्या पाठिश खंबीर रहाण्याचा निर्धार केला असून, कायदेतज्ञांच्या सल्यानुसार …

Read More »

धावत्या एसटी बसमध्ये जावयाचा दोरीने गळा आवळून खून; सासू-सासऱ्याला अटक

  कोल्हापूर : दारू पिऊन मुलीला नेहमी मारहाण करणाऱ्या मद्यपी जावयाचा दोरीने गळा आवळून सासू-सासऱ्यानेच गडहिंग्लज – कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये खून केला. मृतदेह कोल्हापुर एसटी स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला परतले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खूनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपूरी पोलिसांनी लावला. सासरा …

Read More »

एनपीएस रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

बेळगाव : राज्य काँग्रेस सरकारने जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे ओपीएसची अंमलबजावणी करावी, अशी मागणी एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे जिल्हाध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी केली. एनपीएस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची आणि राजस्थान मॉडेलवर जुनी पेन्शन प्रणाली सुरू ठेवण्याची विनंती केली. एनपीएस योजनेमुळे …

Read More »

अथणी येथील एका तरुणावर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला

  अथणी : कांही दिवसांपूर्वी अथणी तालुक्यातील काकमरी गावात जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती अथणी शहरातील शशिकांत लक्ष्मण आक्केण्णावर या तरुणाला मिळाली. त्यानुसार सदर तरुण जमीन पाहण्यासाठी गेला असता तेथील एका महिलेसह ६ अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणाच्या मांडीवर लाथ मारण्यात आली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. …

Read More »

मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून महिलेला विहिरीत ढकलले

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील मसणाई देवस्थानाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या देवस्थानातील चांदीचे दागिने चोरीला गेले असून मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. भारती पुजारी (रा. शिंदोळी, वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून …

Read More »

मंगाई नगर तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

  बेळगाव : वडगावमधील मंगाईनगर तलावात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही व्यक्ती दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडली असावी, अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. सदर घटना शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून पुढील …

Read More »