अथणी : कांही दिवसांपूर्वी अथणी तालुक्यातील काकमरी गावात जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती अथणी शहरातील शशिकांत लक्ष्मण आक्केण्णावर या तरुणाला मिळाली. त्यानुसार सदर तरुण जमीन पाहण्यासाठी गेला असता तेथील एका महिलेसह ६ अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणाच्या मांडीवर लाथ मारण्यात आली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर अथणीचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालयात आल्यानंतरही आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी भीती या तरुणाने व्यक्त केली आहे. हल्लेखोरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जखमी तरुणाने केली आहे. याप्रकरणी ऐगळी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.