बेळगाव : वडगावमधील मंगाईनगर तलावात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही व्यक्ती दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडली असावी, अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. सदर घटना शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.