Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे विविध स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बालिका आदर्श शाळेमध्ये घेण्यात आलेल्या पाढे पाठांतर स्पर्धेत मराठी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. प्रथम क्रमांक अन्विता महेश चतुर, द्वितीय क्रमांक पूर्वी रमेश घाडी, तृतीय क्रमांक जयेश रवींद्र गुरव त्याचबरोबर देसुर येथे झालेल्या येळ्ळूर झोनल लेवल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये …

Read More »

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : शिवकुमार

  बंगळूर : मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली असली तरी सिद्धरामय्या यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले …

Read More »

चौकशीला घाबरणार नाही, सत्य समोर येईल

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील लढ्याची रूपरेषा बंगळूर : कोणत्याही चौकशीला मी मागेपुढे पाहणार नाही, सत्याचा विजय होईल. भाजप आणि धजदने माझ्याविरुद्ध ‘राजकीय सूड’ घेतला आहे, कारण मी ‘गरीबांचा समर्थक असून सामाजिक न्यायासाठी लढत आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावर दिली. सिद्दरामय्या म्हणाले, “मी चौकशीस …

Read More »

बेळगावमध्ये भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने आंदोलन

  बेळगाव : बेळगाव शहरात विविध ठिकाणी भरणारा फुलबाजार, फळबाजार, चिंच, केळी यासह खाजगी एपीएमसीचे सरकारी एपीएमसीत स्थलांतर करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कन्नड साहित्य भवन पासून सुरु झालेल्या निषेध मोर्चातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सरकार विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या अनेक …

Read More »

दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  खानापूर : खानापूर येथील दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ताराराणी हायस्कूलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री. अजित सावंत होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक सलीम कित्तूर व संचालक उपस्थित मुख्याध्यापकांच्या …

Read More »

येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

  बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाला मंगळवार (ता. 24) रोजी सकाळी सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, ग्रामपंचायत सदस्या राजकुंवर पावले, सदस्य राजू डोन्यान्नावर यांच्या हस्ते पूजन करून पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या फंडातून या कामाला सुरुवात करण्यात …

Read More »

निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेटला ५.९९ लाखाचा नफा

  निपाणी (वार्ता) : येथील निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप इस्टेटची ३७ वी वार्षिक सभा संस्थेच्या आवारात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते. संस्थेचे संचालक सुधाकर थोरात यांनी, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू आहे. यापूर्वी काळात त्यांनी संस्थेच्या शिर्डीच्या प्रश्न सोडवून सहकार्य …

Read More »

शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या रक्कमेसाठी रयत संघटनेचा गदग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  निपाणी (वार्ता) : गदग जिल्ह्यात हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. पण एका कंपनीतील दोघांनी अनेक शेतकऱ्याकडून सात कोटी रुपयांचा हरभरा खरेदी केला होता. पण नऊ महिने होऊनही रक्कम न दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पुढाकाराने संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नापा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली गदग जिल्हाधिकारी …

Read More »

शिवबसप्पा गिरण्णावर वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

  शाहिस्ता तिगडी महाविद्यालयात पहिली : राघवेंद्र चौधरी याने मिळविला दुसरा तर अंकिता सकपाळ तिसरा क्रमांक बेळगाव : राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या सत्र परीक्षेत टीचर कॉलनी, खासबाग येथील बेलगाम लीडरशिप अकॅडमी संचलीत शिवबसप्पा गिरण्णावर वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाहिस्ता तिगडी या विद्यार्थिनीने 92.42 …

Read More »

बळ्ळारी नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढू : मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांना दिला. दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पावसाळ्यात पूर येतो व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत तर नाहीच समस्यांवर कायमस्वरूपी तोडगाही काढता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी बळ्ळारी …

Read More »