शाहिस्ता तिगडी महाविद्यालयात पहिली : राघवेंद्र चौधरी याने मिळविला दुसरा तर अंकिता सकपाळ तिसरा क्रमांक
बेळगाव : राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या सत्र परीक्षेत टीचर कॉलनी, खासबाग येथील बेलगाम लीडरशिप अकॅडमी संचलीत शिवबसप्पा गिरण्णावर वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाहिस्ता तिगडी या विद्यार्थिनीने 92.42 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात पहिला क्रमांक घेतला. राघवेंद्र चौधरी या विद्यार्थ्याने 91.57 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात दुसरा तर अंकिता सकपाळ हिने 87.85 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
या यशाबद्दल बीएलए संस्थेचे अध्यक्ष विशाल कळसण्णावर, प्राचार्या नंदिनी कळसण्णावर, डीन अकॅडमीक्स मुजम्मिल मोकाशी, लर्निंग अँड डेव्हलपमेंट अधिकारी फाल्गुनी गेंजी आणि प्राध्यापक वर्गाने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.