मुख्यमंत्री सिद्धरामय्या; कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील लढ्याची रूपरेषा
बंगळूर : कोणत्याही चौकशीला मी मागेपुढे पाहणार नाही, सत्याचा विजय होईल. भाजप आणि धजदने माझ्याविरुद्ध ‘राजकीय सूड’ घेतला आहे, कारण मी ‘गरीबांचा समर्थक असून सामाजिक न्यायासाठी लढत आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावर दिली.
सिद्दरामय्या म्हणाले, “मी चौकशीस घाबरणार नाही. कायद्यानुसार अशा तपासाला परवानगी आहे की नाही याबाबत मी तज्ञांशी सल्लामसलत करेन. मी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून लढ्याची रूपरेषा ठरवेन. मला विश्वास आहे की येत्या काही दिवसांत सत्य बाहेर येईल आणि १७ एअंतर्गत तपास रद्द केला जाईल.”
मला विश्वास आहे की येत्या काही दिवसांत सत्य बाहेर येईल आणि १७ ए अंतर्गत तपास रद्द केला जाईल. या राजकीय संघर्षात राज्यातील जनता माझ्या पाठिशी आहे. त्याचे आशीर्वाद माझे रक्षण. माझा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. या संघर्षात शेवटी सत्याचाच विजय होईल, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरुद्धचा हा लढा आहे. भाजप आणि धजदच्या या सूडाच्या राजकारणाविरुद्ध आमचा न्यायालयीन संघर्ष सुरूच राहील. माझा न्यायालयावर विश्वास आहे. आमच्या पक्षाचे सर्व आमदार, नेते आणि कार्यकर्ते आणि काँग्रेस हायकमांडने माझ्या पाठीशी उभे राहून कायद्याचा लढा सुरू ठेवण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आहे.
भाजप आणि धजदने माझ्याविरुद्ध राजकीय सूड उगवला आहे कारण मी गरीब समर्थक आहे आणि सामाजिक न्यायासाठी लढत आहे. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मी अशा सूडाच्या, षडयंत्राच्या राजकारणाचा सामना केला आणि राज्यातील जनतेच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी जिंकत आलो आहे. जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर ही लढाई जिंकू असा विश्वास त्यांनी पोस्ट केला आहे.
मुडा प्रकरण हा केवळ दिखाऊपणा आहे. भाजप आणि धजद पक्षांचा मुख्य उद्देश आमच्या सरकारच्या गरीब आणि शोषितांच्या हिताच्या योजना बंद करणे हा आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी करणारे हेच नेते आहेत, ज्यांनी राज्यातील गरीब आणि शोषितांसाठी मी राबवलेल्या योजनांना विरोध केला आहे. याच भाजप आणि धजद नेत्यांनी मी प्रथम मुख्यमंत्री असताना राबवलेल्या अन्नभाग्य, क्षीर भाग्य, विद्यासिरी, कृषिभाग्य, पशुभाग्य, इंदिरा कॅन्टीन योजनांना विरोध केला आहे. आज तेच नेते जे माझ्या विरोधात कट रचत आहेत त्यांनी एससीएसपी/टीएसपी कायद्याला विरोध केला आहे.
तसेच कर्नाटकातील जनतेने भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तेत येण्याइतपत बहुमत दिलेले नाही. भाजप आतापर्यंत ऑपरेशन कमळ, अनैतिक मार्गाच्या जोरावर सत्तेत आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने ऑपरेशन कमळला एकही संधी न देता आमच्या पक्षाला १३६ सदस्यांचे संख्याबळ दिले. त्यामुळे हताश झालेल्या भाजप आणि धजदच्या नेत्यांनी राजभवनाचा गैरवापर करून आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशभरात राजभवनाचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या सरकारला शिक्षा करण्याचे कारस्थान करत आहे. माझ्या बाबतीतही भाजप आणि धजदचा निश्चित मुखभंग होईल, असा विश्वस त्यांनी व्यक्त केला.