Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

  कोल्हापूर (जिमाका) :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै …

Read More »

गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील शाळांना सुट्टी

  बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश बेळगाव जिल्ह्यातील शासकीय, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा …

Read More »

अंत्यसंस्कार करण्यास गुडघ्याभर पाण्यातून नेण्यात आला वृद्ध महिलेचा मृतदेह!

  बेळगाव : बेळगाव येथील अमन नगरमध्ये परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आणि त्याचदरम्यान घरातच पाय घसरून पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. महबूबी आदम साहेब मकानदार (७९) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कार करण्यातही मोठी अडचण निर्माण झाली. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवाय, …

Read More »

संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून, पाण्याच्या पातळीतील चढउताराची माहिती मागविण्यात आली. नंतर त्यांनी हिरेबागेवाडी येथील पूरस्थितीची पाहणी …

Read More »

डॉ. दत्तात्रय देसाई यांचा ‘दस्तक ..अनसुनी आहट’ हा हिंदी कविता संग्रह प्रकाशित

  बेळगाव : बेळगावचे सुपत्र डॉ. दत्तात्रय ज्ञानदेव देसाई यांचा पहिला कविता संग्रह “दस्तक ….. अनसुनी आहट” याचे प्रकाशन हिंदी प्रचार सभा हैद्राबाद येथे करण्यात आले… यावेळी दक्षिण भारत हिन्दी प्रचार सभा आंध्रप्रदेश व तेलंगाणाचे अध्यक्ष श्री. पी. ओबय्या, सचिव श्रीमती ए. जानकी, कोषाध्यक्ष श्री. मुहम्मद खासीम, प्रबंध निधिपालक श्री. …

Read More »

सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीमने घेतला आढावा

  चिकोडी : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून, सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले आहे. किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे. या दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासातासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने …

Read More »

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबियांची परिस्थिती पूर्णतः हलाखीची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. पाटील …

Read More »

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा; कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे विनंती

  कोल्हापूर : अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली भागाला महापुराचा पुन्हा मोठा धोका उद्भवू शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली …

Read More »

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

  खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू …

Read More »