Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

अन कामगारांनी हटवली भली मोठी फांदी….

  बेळगाव : बेळगाव येथील “वन टच फाऊंडेशनचे” अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल फर्निचर उद्योजक श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांच्या ऑटोनगर येथील फर्निचर दुकानच्या गल्लीमध्ये रात्री भली मोठी झाडाची फांदी तुटून पडलेली होती. तेथून या जायला वाहतुकीला रस्ता बंद झाला होता, ते पाहून विठ्ठल फर्निचर मधील काम करणाऱ्या सर्व कामगारांनी …

Read More »

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

    मुंबई : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार …

Read More »

अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढविण्यासंदर्भात महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

  सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची मागणी

  खानापूर : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे. तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी पाजण्यासाठी वापरले जाते, या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण …

Read More »

पावसाचा जोर कायम; पुन्हा दोन दिवस सुट्टी जाहीर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 25 जुलै आणि शुक्रवार दि. 26 रोजी आणखी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील …

Read More »

दुचाकीचोरांकडून ७ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त : टिळकवाडी पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त याडा मारबानियांग, डीसीपी स्नेहा पी.व्ही., सहायक पोलीस आयुक्त एच. शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत वीरभद्रनगर, बेळगाव येथील रहिवासी हैदरअली शेख, अमननगर …

Read More »

ऑगस्ट महिन्यात इस्कॉनमध्ये भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने येत्या ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक एक ऑगस्ट रोजी मॉरिशसच्या इस्कॉनचे श्री सुंदर चैतन्य गोसावी महाराज यांचे आगमन होत असून एक, दोन व तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत त्यांची प्रवचने होणार आहेत. दिनांक …

Read More »

पूरस्थितीत मदत कार्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून बेळगाव, निपाणी व खानापूरात समाजसेवकांची टीम जाहीर

  बेळगाव : संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बेळगाव शहर व तालुका, निपाणी शहर व ग्रामीण परिसर व खानापूर तालुक्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून समाजसेवकांची टीम जाहीर करण्यात आली आहे. या पूरस्थितीमुळे कोणाला कोणतीही समस्या उदभवल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेकडून …

Read More »

गोकाक तालुक्यात स्कूल बस उलटून ६ विद्यार्थी गंभीर

  गोकाक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थी गंभीर जखमी तर अनेक जण किरकोळ जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉसजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मरडीमठ या खासगी शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले …

Read More »