Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पाय घसरून नदीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाजवळ पाय घसरून नदीत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहन पाटील (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. नैवेद्य सोडण्यासाठी मित्रासोबत नदीवर गेला असता पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचच्या …

Read More »

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भर पावसात शेतकरी रस्त्यावर!

  बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना बेळगाव समितीच्या वतीने बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आंदोलन करण्यात आले. आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द करावी, …

Read More »

आंबेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रम

  बेळगाव : आंबेवाडी येथील राजा श्री छत्रपती शिवस्मारक सेवा संघ आंबेवाडी नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रम म. ए. समितीचे युवा नेते श्री. आर. एम. चौगुले व अध्यक्षा सौ. लक्ष्मी येळगुकर यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी शिवाजीराव अतिवाडकर हे होते. दीपप्रज्वलन माजी नगरसेवक उद्योजक बाळासाहेब …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुशाप्पा पाटील उपस्थित होते. सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. मासा …

Read More »

निपाणी – सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी

  निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहचण्यास रात्री उशिरा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वरील वेळेऐवजी सायंकाळी ५:१० वाजता बस सोडून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते आगार प्रमुख संगाप्पा यांना …

Read More »

श्री चांगळेश्वरी युवक मंडळातर्फे आदित्य आनंद पाटील याचा सत्कार

  बेळगाव : येळ्ळूर येथील कु. आदित्य आनंद पाटील याने 2024 मध्ये झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत 95% गुण मिळवून जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम तसेच, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून कर्नाटक राज्यात सुवर्णपदकासह चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्यातर्फे 21-07-2024 रोजी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उद्योजक एन. डी. …

Read More »

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली!

  पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर …

Read More »

कॅपिटल वनतर्फे ओमकार शाम सुतार यांचा सत्कार

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये घवघवित यश संपादन केलेल्या संस्थेचे संस्थेचे सभासद ओमकार शाम सुतार यांचा नुकताच संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ओमकार यांचे अभिनंदन केले. आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळेच कु.ओमकार याने हे यश संपादन केले असेही नमूद करून भविष्यात …

Read More »

येळ्ळूरमधील समस्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील यांना नागरिकांचे निवेदन

  येळ्ळूर : येळ्ळूर गावामधील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील नागरिकांनी बेळगाव दक्षिण दक्षिण भागाचे आमदार अभय पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीच्या समोर असलेला येळ्ळूरमधील महत्त्वाचा चौक म्हणजे लक्ष्मी चौक होय. या चौकात सर्वत्र पेव्हर्स बसवून या चौकाचे सुशोभीकरण करावे, तसेच सिद्धेश्वर …

Read More »

नियती फाऊंडेशनतर्फे खानापूर न्यायालयात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

  खानापूर : नियती फाऊंडेशन आणि गुरुदेव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएमएफसी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश हिरेमठ हे उपस्थित होते. यावेळी बसवराज हपळ्ळी, ऍड. आर. एन. पाटील यांच्यासह वकील वर्ग, …

Read More »