Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

धोतर नेसलेल्या वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बंगळुरूमधील घटना

  बंगळुरू : धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली आहे. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी एक वृद्ध या मॉलमध्ये आला होता, पण मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखलं व धोतर नेसून आत येण्यास मनाई केली. त्याला मॉलमध्ये यायचं असेल तर पँट घालावी लागेल असं त्या …

Read More »

कोल्हापूरातील सर्वधर्मियांनी शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून एकीचे दर्शन घडविले

  कोल्हापूर : सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरुन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही विचलित होणार नाही, तर प्रतिगाम्यांचे हे प्रयत्न अधिक ताकदीने हाणून पाडू, असा …

Read More »

सूर्याकडे टी20 कर्णधारपदाची जबाबदारी तर शुभमन गिल उपकर्णधार

  नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्वाचं म्हणजे, वनडे आणि टी20 संघाचे उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश

  नवी दिल्ली : नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (१८ जुलै) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती …

Read More »

खानापूर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना १९ व २० रोजी सुट्टी

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर तालुका शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांना शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची मागणी केली. …

Read More »

उत्तर प्रदेशात रेल्वे रुळावरून घसरली; चौघांचा मृत्यू

  चंदीगड : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत चौघा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गोंडापासून ३० किलोमीटर …

Read More »

“त्या” नराधमावर कठोर कारवाई करावी; कडोली ग्रामस्थांचा निषेध

  बेळगाव : कडोली गावात काल घडलेल्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोली ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुटुंबाला गावातून हाकलून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले. तत्पूर्वी कडोली ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार स्वेच्छेने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी …

Read More »

राकसकोप जलाशय लवकरच भरणार; चार फूट पाण्याची आवश्यकता

  बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बेळगावनगरीतील नागरिकांना समाधान होत आहे. बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेले राकसकोप जलाशय लवकरच भरणार आहे. 0.60 टीएमसी क्षमतेच्या जलाशयाची एकूण उंची 2475 फूट आहे. आजची पाण्याची पातळी 2471.4 फूट …

Read More »

अनमोड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

  खानापूर : बेळगाव लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडत आहे. बेळगाव-पणजी मार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान नजीक आज पहाटे दरड कोसळली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात येईल. दरड कोसळत असल्याने या घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी …

Read More »

खासगी नोकऱ्यांमध्ये कन्नडिगांना १०० टक्के आरक्षण लागू करण्याबाबतच्या विधेयकाला कर्नाटक सरकारची स्थगिती

  बंगळुरू : राज्य मंत्रिमंडळाने कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली होती. मात्र कर्नाटक सकारने आपला निर्णय आता मागे घेतला आहे. सिद्धरामय्या सरकारने त्यांच्याच निर्णयावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी नोकऱ्यांमध्ये कानडी लोकांना आता आरक्षण मिळणार नाही किंवा त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागू शकते. कर्नाटकमधील काँग्रेस …

Read More »