Sunday , September 20 2026
Breaking News

धोतर नेसलेल्या वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बंगळुरूमधील घटना

Spread the love

 

बंगळुरू : धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली आहे. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी एक वृद्ध या मॉलमध्ये आला होता, पण मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखलं व धोतर नेसून आत येण्यास मनाई केली. त्याला मॉलमध्ये यायचं असेल तर पँट घालावी लागेल असं त्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं.

एका वृद्ध व्यक्तीला बंगळुरूमधील एका शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण त्याने धोतर नेसलं होतं. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडिया युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत, अनेकांनी मॉलविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

मॉलमध्ये काय घडलं?
व्हायरल व्हिडीओत दिसतंय की एक तरुण आपल्या वृद्ध वडिलांबरोबर जीटी मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी आला होता. पण, प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांना अडवलं. या दोघांकडे चित्रपटाची आधीच बूक केलेली तिकिटं होती, तरीही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. धोतर नेसून या मॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्याने आत यायचं असेल तर पँट घालून यावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर त्यांनी आत सोडण्याची विनंती केली पण मॉल कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही.

मॉल कर्मचाऱ्यांनी मागितली माफी
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मॉलच्या कर्मचाऱ्यांवर खूप टीका केली. प्रकरण जास्तच चर्चेत आल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाची माफी मागत त्यांचा सन्मान केला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *