Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना १९ व २० रोजी सुट्टी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर तालुका शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांना शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची मागणी केली. त्यानुसार शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना रजा मंजूर करण्याची विनंती केली. खानापूर तालुक्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खानापूर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना शुक्रवार १९ व शनिवार २० रोजी दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *