Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी बोलाविण्यात आले आहे. पुढील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन उभारणेबाबत, प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणेबाबत, कार्याचे विकेंद्रीकरण व …

Read More »

लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने स्कूल बॅगचे वितरण

  बेळगाव : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व त्यांचे बंधू श्री. चंद्रकांत कोंडुसकर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप गव्हर्मेंट मराठी पूर्ण प्राथमिक …

Read More »

खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी

  बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. विकेंडला या भागातील धबधबे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. बेळगावात मुसळधार पाऊस, नद्या, धबधबे ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधबा पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बटावडे …

Read More »

सार्वजनिक आस्थापनांवर मराठीत भाषेत फलक लावावेत यासंदर्भात सोमवारी खानापूर समितीची बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक आस्थापनांचे मराठीत नामकरण करून तसे फलक लावावेत यासंदर्भात यापूर्वी परिवहन महामंडळ, खानापूर, बेळगांव, हुबळी कार्यालयांना यासंबंधीत निवेदन दिले आहे. तसेच …

Read More »

बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची निर्घृण हत्या

  चेन्नई : मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची ६ हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक ६ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी …

Read More »

धामणे येथे घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आग

  बेळगाव : एकीकडे शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे धामणे गावात मात्र कुलूपबंद वाहनांना आग लावून पळ काढल्याच्या घटना समोर येत आहेत. काल रात्री काही अज्ञातांनी आपल्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना आग लावून पलायन केले आहे. धामणे गावात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

  खानापूर : आज शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, जळगेहट्टी, चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ, शीवोली,का, हेब्बाळहट्टी, लालवाडी, कौंदल, झाडनावगे, हेब्बाळ,जे.सी.एच. शाळा नंदगड व संत मेलगे शाळा नंदगड, कसबा नंदगड, भत्तीवडे या …

Read More »

अनुसूचित जाती, जमातीचे अनुदान संबंधित वर्षातच खर्च व्हावे : मुख्यमंत्र्यांचा इशारा

  अनुसूचित जाती, जमाती राज्य विकास परिषदेची बैठक बंगळूर : एससीएसपी आणि टीएसपी अंतर्गत अनुदान संबंधित वर्षातच खर्च केले जावे. या कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राज्य विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी वाटप …

Read More »

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध : काँग्रेस नेते महादेव कोळी

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध आहेत. भारतीय जनता पार्टीसारखे गलिच्छ राजकारण काँग्रेस पक्ष कधीच करत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने असतो, असे काँग्रेस नेते महादेव कोळी म्हणाले. कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना तालुक्याच्या आमदार म्हणून डॉ. अंजलीताई निंबाळकर या विकास कामे राबवीत …

Read More »

बेळगावात ८ जुलै रोजी पंचमसाली आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन : पंचमसाली स्वामीजी

  बेळगाव : पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी पंचमसाली समाजाच्या सर्व आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली गुरुपीठाचे अध्यक्ष श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण मिळावे …

Read More »