Monday , September 21 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

 

खानापूर : आज शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, जळगेहट्टी, चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ, शीवोली,का, हेब्बाळहट्टी, लालवाडी, कौंदल, झाडनावगे, हेब्बाळ,जे.सी.एच. शाळा नंदगड व संत मेलगे शाळा नंदगड, कसबा नंदगड, भत्तीवडे या गावातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना सदर शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समिती उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी यांनी सर्व शाळांना भेटी देत सदर साहित्य वितरित केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *