Monday , September 21 2026
Breaking News

धामणे येथे घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आग

Spread the love

 

बेळगाव : एकीकडे शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे धामणे गावात मात्र कुलूपबंद वाहनांना आग लावून पळ काढल्याच्या घटना समोर येत आहेत. काल रात्री काही अज्ञातांनी आपल्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना आग लावून पलायन केले आहे. धामणे गावात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे कष्टकरी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामीण पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, तसेच अशी कृत्ये करणाऱ्या समाजविघातकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडलेल्या या घटनेनंतर येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले असून पोलिसांनी त्वरित अशा घटनांच्या मागील अज्ञातांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *