Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

मंगाईनगर रहिवाशांनी घेतली महानगरपालिका अभियंत्यांची भेट

  बेळगाव : श्री मंगाईनगर रहिवाशी संघटना आणि महिला मंडळ यांच्या वतीने दि. 4 जुलै रोजी महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यामध्ये मंगाईनगर रस्ता यात्रेपूर्वी येण्या-जाण्यासाठी खुला करण्यात यावा तसेच अर्धवट स्थितीत पडलेला तलाव पूर्ण करून तलावाच्या बाजूने कठडा बांधण्यात यावा आणि जीवितहानी टाळावी. मंगाईनगरला जाण्यासाठी …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बदली

  बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या हुबळी येथील हेस्कॉमचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितेश पाटील यांच्याकडे बेंगलोर येथील लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे. मोहम्मद रोशन हे …

Read More »

बेळगावात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ : खबरदारी आणि उपचार आवश्यक : आरोग्य अधिकारी महेश कोणी

  बेळगाव : पावसाळा सुरू झाला असून संसर्गजन्य आजार वाढले आहेत. ताप आल्यावर लोकांनी दुर्लक्ष करू नये, शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे जिल्हा आरोग्य महेश कोणी यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सांगितले की, जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. त्यामुळे …

Read More »

मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल

  मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आज विश्वविजेता टीम इंडियाचं आगमन झालं. सायंकाळी 5 नंतर वर्ल्डकपविजेत्या टीम इंडियाचे सर्वच शिलेदार मुंबईतील विमानतळावर उतरले. त्यानंतर, मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास विशेष बसमधून करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या स्वागताला मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. वानखेडे …

Read More »

मातृभाषेतून शिक्षण घेणे काळाची गरज : आबासाहेब दळवी

  युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये गुरुवार दि. ४ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या व इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हरसनवाडी, रामगुरवाडी, बाचोळी, छ. शिवाजी नगर, हलकर्णी, डूक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी, …

Read More »

चक्क “सेटलमेंट चौकडी”ने दिले राष्ट्रीय पक्षाला “कोटेशन”

  (३) नुकताच शहर समितीची बैठक पार पडली. ही बैठक निवडणुकीच्या पराभवानंतरची चिंतन बैठक होती की औपचारिक बैठक हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. या बैठकीला चिंतन बैठक म्हंटल तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कारणमीमांसा झालेली कुठेच पहावयास मिळत नाही. किंवा या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. यातूनही कार्यकर्त्यातून …

Read More »

माणकापूरमध्ये यंत्रमागधारकावर चाकूने हल्ला

  निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे गुरुवारी (ता.४) पहाटे एका व्यक्तीने यंत्रमागधारकावर चाकू हल्ला केला. सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर कोरवी असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. जखमी कुंभार यांना चिक्कोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयिताने यापूर्वी माणकापूर ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ …

Read More »

बेळगावात डेंग्यू, मलेरियाची दहशत : महापालिका आयुक्तांकडून फॉगिंग

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन साफसफाईच्या कामाची पाहणी करून फॉगिंग फवारणी केली. अनगोळ बीट कार्यालयात सफाई कामगारांच्या ऑनलाइन बायोमेट्रिक आणि ऑफलाइन उपस्थितीची माहिती घेऊन पाहणी केली. नाथ पै सर्कलला भेट देऊन स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली, इंदिरा कॅन्टीनला भेट देऊन जेवणाचा …

Read More »

जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी काउंटरसमोर तळ्याचे स्वरूप!

  बेळगाव : एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या सुधारणेसाठी होत असलेले प्रयत्न, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, सोयी, उपचार पद्धती या सर्वच गोष्टींचा दर्जा सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या नेहमीच्याच समस्या यामुळे नागरिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नेहमीच ताशेरे ओढत असतात. आज येथील ओपीडी काउंटरसमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची …

Read More »

हलगा येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक; चार जखमी

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे एक नियंत्रण सुटलेला कंटेनर दुभाजकावर चढून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील अलारवाड ब्रिजजवळील ऑक्स वॅगन शोरूमजवळ गुरुवारी पहाटे एका कंटेनरचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. तसेच बंगळुरूहून …

Read More »