Wednesday , April 22 2026
Breaking News

मंगाईनगर रहिवाशांनी घेतली महानगरपालिका अभियंत्यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : श्री मंगाईनगर रहिवाशी संघटना आणि महिला मंडळ यांच्या वतीने दि. 4 जुलै रोजी महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यामध्ये मंगाईनगर रस्ता यात्रेपूर्वी येण्या-जाण्यासाठी खुला करण्यात यावा तसेच अर्धवट स्थितीत पडलेला तलाव पूर्ण करून तलावाच्या बाजूने कठडा बांधण्यात यावा आणि जीवितहानी टाळावी. मंगाईनगरला जाण्यासाठी धामणे रोड जवळून एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर वडगाव येथील कचरावाहू वाहने देखील थांबलेली असतात. सकाळच्या वेळेत शाळकरी मुले आणि कामगारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच परिसरातील शेतकरी बांधव आणि जनावरांची देखील या रस्त्यावरून ये -जा चालू असते त्यामुळे सकाळच्या वेळेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरील अडथळे लवकरात लवकर दूर करावेत आणि श्रीमंगाई मंदिर परिसरातील रा
स्ता रहदारीस खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी श्री मंगाईनगर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *