Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

स्वप्नपूर्ती! भारत टी-20 क्रिकेटचा विश्वविजेता

  नवी दिल्ली : भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं …

Read More »

समितीमधील स्वयंघोषित “महाभागां”नी केला “लेटरहेड” गैरवापर!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये काहीशी मरगळ आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपते की काय अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात भीती करून राहिली आहे. अशावेळी समितीने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या पराभवाची कारणमीमांसा …

Read More »

गोकाक येथे बसची वाट पाहणाऱ्या लोकांना कारने ठोकरले : एका महिलेचा मृत्यू

  गोकाक : गोकाक नाका क्रमांक १ जवळ बसची वाट पाहत असलेल्या बाराहून अधिक लोकांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले. गंगाव्वा फक्कीरस्वामीमठ (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. गोकाकानाका क्रमांक १ जवळ अनेक लोक बसची वाट पाहत उभे होते. …

Read More »

आम. आसिफ सेठ यांच्या हस्ते अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोनचे वितरण

  बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने मंजूर केलेल्या अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोन आणि आरोग्य किटचे वाटप केले. उत्तर विभागात येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांना कर्नाटक राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मंजूर झालेले स्मार्ट फोन, साड्या, आरोग्य किट आणि वह्या …

Read More »

वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासा : प्रा. अशोक आलगोंडी

  प्रा. अशोक आलगोंडी यांच्याकडून कागवाड शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप कागवाड : मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून पुस्तके वाचल्याने ते विचार करू लागतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासायला हवी. ग्रंथालयाला यापुढेही ग्रंथ मिळवून द्यायला सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. येथील सरकारी मराठी …

Read More »

महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

  मुंबई : महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिक विद्यार्थ्यांची दिशाभूल! सातवीच्या पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती

  बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाप्रश्नासंदर्भात नेहमीच चुकीची माहिती पसरवत असतात. याचाच प्रत्यय यंदाच्या सातवीच्या अभ्यासक्रमात घेतलेल्या समाजविज्ञानच्या एका धड्यात आला आहे. कर्नाटक राज्य सरकारने “कर्नाटकाचे एकीकरण व सीमावाद” हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. यामध्ये सीमाप्रश्नासंदर्भात चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने …

Read More »

बंगळूर – पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे आजपासून सुरू

  बेळगाव : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या विशेष रेल्वे सेवेचा आज प्रारंभ होत आहे. रेल्वे क्र. 06501 बेंगलोर येथून आज 29 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 …

Read More »

भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्याचा अपघात, ५ जवान शहीद

  नवी दिल्ली : कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टॅंकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाल्याची …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या २०२४-२५ च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा दि. २७ जून २०२४ रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकार ग्रहण सोहळा पार पडला. नूतन कार्यकारिणीत श्री. सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. …

Read More »