Sunday , July 26 2026
Breaking News

गोकाक येथे बसची वाट पाहणाऱ्या लोकांना कारने ठोकरले : एका महिलेचा मृत्यू

Spread the love

 

गोकाक : गोकाक नाका क्रमांक १ जवळ बसची वाट पाहत असलेल्या बाराहून अधिक लोकांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले.

गंगाव्वा फक्कीरस्वामीमठ (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. गोकाकानाका क्रमांक १ जवळ अनेक लोक बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि प्रथम बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना या कारने ठोकरले. नंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. शेवटी समोरून येणाऱ्या परिवहन बसची बसला धडक बसली, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या आणखी १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गोकाक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *