Monday , September 21 2026
Breaking News

वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासा : प्रा. अशोक आलगोंडी

Spread the love

 

प्रा. अशोक आलगोंडी यांच्याकडून कागवाड शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

कागवाड : मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून पुस्तके वाचल्याने ते विचार करू लागतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासायला हवी. ग्रंथालयाला यापुढेही ग्रंथ मिळवून द्यायला सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले.
येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये प्रा. अशोक आलगोंडी यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य आणि ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री. आर. पी. भोसले यांनी स्वागत करून या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले यावेळी जेष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी अशा ग्रंथभेटीतून ‘वाचा आणि लिहा’ सारखे उपक्रम राबवता येतात असे मत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक श्रीमती आय आय कांबळे, श्रीमती जी एम नायक, श्रीमती ए के भंडारे, श्रीमती पी एस पाटील, श्रीमती डी ए जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार श्री. बी बी खोत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *