Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने कामगार, विद्यार्थी तसेच रोजगार (मनरेगा) कामगारांचे जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना कामगार कल्याण मंडलातर्फे शिष्यवृत्ती मागिल दोन वर्षापासून मिळालेली नाही. भविष्यकाळानूसार त्यात वाढ करण्याऐवजी असलेल्या स्कॉलरशिपमध्ये अन्यायपूर्वक 75% ने कपात केलेली आहे. सरकाराच्या या …

Read More »

युवकांनो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करा

  आमदार राजू सेठ; निपाणी येथे सत्कार निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून शैक्षणिक क्षेत्रातही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे समाजाने याकडे लक्ष देऊन काम हाती घ्यावे. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी,असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार व अंजुमन मुस्लिम बोर्डचे अध्यक्ष राजू सेठ यांनी …

Read More »

तालुका समितीच्या वतीने पुण्यश्लोक जिजामाता जयंती साजरी

  बेळगाव : पुण्यश्लोक जिजामातानी लहानपणीच शिवरायावर चांगले संस्कार घडवून त्यावेळच्या मोगली व अन्याय राजवटीविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त केले. म्हणून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केलं, स्वराज्यातील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, यामध्ये जिजामातेचा सिंहाचा वाटा आहे. जिजामाता मुळेच शिवराय घडले व समाजासमोर अनेक वर्षापासून त्या पुण्यश्लोक …

Read More »

गरीबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाच हमींची अंमलबजावणी

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिमोगा येथून ‘युवानिधी’ योजनेला चालना बंगळूर : आमच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार पाच हमी योजनांची अंमलबजावणी केली असून गरीब आणि मध्यमवर्गीयांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने योजना जारी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. शिमोगा येथील फ्रीडम पार्क येथे सहा बेरोजगार तरुणांना धनादेशाचे वाटप …

Read More »

सेंट जॉन स्कूल, एम आर भंडारी गोगटे कॉलेज संगोळी रायण्णा कॉलेज यांना विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर हॉकी इंडिया व हॉकी कर्नाटक यांच्या मान्यतेने हॉकी बेळगांव आयोजित मुला-मुलींच्या आंतरशालेय गटात सेंट जॉन काकती, व एम आर भंडारी व आंतर महाविद्यालयीन गटात गोगटे कॉलेज व संगोळी रायण्णा कॉलेज यांनी विजेतेपद कॉलेज यांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सागर …

Read More »

संगोळ्ळी रायण्णा वीरज्योतीचे बेळगावात भव्य स्वागत

  बेळगाव : नंदगड येथे 17 जानेवारी रोजीपासून सुरु होणाऱ्या संगोळ्ळी रायण्णा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा ज्योतीचे बेळगावात आज मान्यवर व अधिकाऱ्यांनी स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या स्मरणार्थ खानापूर तालुक्यातील नंदगड येथे 17-18 जानेवारी रोजी होणाऱ्या संगोळ्ळी रायण्णा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा …

Read More »

महांतेश कवटगीमठ फौंडेशनची 16 जानेवारीला स्थापना

  बेळगाव : कवठगीमठ कुटुंब तीन पिढ्यांपासून कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सेवा करत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती आणि सहकार क्षेत्रात अधिक व्यापक काम करण्याच्या उद्देशाने 16 जानेवारी रोजी ‘महांतेश कवटगीमठ फौंडेशन’चा उद्घाटन सोहळा आयोजित केल्याचे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले. बेळगावात आज पत्रकार …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे यश

  निपाणी (वार्ता) : होसदुर्ग येथे दुसरी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये फाईट, पूम्से व स्पीड पंच अशा स्वरूपात स्पर्धा झाल्या. त्यामध्ये येथील सद्गुरु अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सद्गुरू तायक्वांदो अकॅडमीला बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन गौरविण्यात आले. शार्विन बिकणावर, सार्थक निर्मले, श्रीविराज मोहिते, बल्लाळेश्वर …

Read More »

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे ही बैठक होणार आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, …

Read More »

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड जाळले

  कोल्हापूर : बेळगावात कन्नड नामफलकांच्या सक्तीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. बेळगाव महाराष्ट्राच्या हक्काचे, ते भविष्यात महाराष्ट्रातच येणार असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड उखडून जाळून टाकले. कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात दुकाने, आस्थापनांना कन्नड भाषेतील नामफलक अनिवार्य केले आहेत. मात्र सरकारने कारवाई …

Read More »