Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : शाळा-कॉलेजची मुले, ज्येष्ठांसाठी जादा बसेस सोडण्याची मागणी करत भारतीय महिला महासंघातर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यभरात मोफत बसप्रवासाची योजना सुरु केली ही चांगली बाब आहे. मात्र यामुळे मुलांना शाळा-कॉलेजच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने त्यांची तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न

  नवी दिल्ली : क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार …

Read More »

वीरभद्रेश्वर मंदिरात श्री भद्रकाली मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम सुरू

  निपाणी (वार्ता) : येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील श्री विरभद्रेश्वर मंदिर येथे विरभद्रश्वर यात्रा, सामुहिक गुग्गुळोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता.१९) श्री भद्रकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, निडसोशी मठ, प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी …

Read More »

भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना आनंदवाडी कुस्ती स्पर्धेसाठी निमंत्रण

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा वर्षे सातत्याने …

Read More »

गंगा म्हाळसा मार्तंड भैरव मल्हारी आणि श्रीमद् जगद्गुरु आदी शंकराचार्य यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना

  बेळगाव : चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्र्वर देवस्थानात गुरुवार दि. २१ रोजी दुपारी बारा वाजता गंगा म्हाळसा मार्तंड भैरव मल्हारी आणि श्रीमद् जगद्गुरु आदी शंकराचार्य यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. स्वर्णवल्ली सोंदा येथील श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य गंगाधरेंद्र सरस्वती यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे …

Read More »

देसाईवाडा तिवोली येथील गणेश मंदिराचा १५वा वर्धापनदिन उत्साहात

  खानापूर : देसाईवाडा तिवोली येथील गणेश मंदिराचा १५वा वर्धापनदिन मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देसाईवाडा आणि तिवोली येथील ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. या छोट्याशा दहा घराच्या वसाहतीमध्ये असे हे गणेश मंदिर उभारले त्याबद्दल मी या ग्रामस्थांचे कौतुक करतो असे तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव …

Read More »

सेल्स रिप्रेझेंटेटिव्हजची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : वैद्यकीय प्रतिनिधींची कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी बेळगाव मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या सदस्यांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या विक्री प्रतिनिधींना कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी, बीपी, शुगरवरच्या औषधांसारख्या …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाचा लवकरच वधू-वर मेळावा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश …

Read More »

घरफोड्याला अटक; 7 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. परशुराम इराप्पा दंडगल वय 32 रा. लक्ष्मी नगर जूने बेळगाव असे या घरफोडी करून चोरी करणाऱ्याचे नाव आहे. बेळगाव शहर गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी …

Read More »

ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला‌. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर (वय दीड वर्ष) हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना …

Read More »