Monday , September 21 2026
Breaking News

ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना

खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला‌.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर (वय दीड वर्ष) हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील तोलगी येथे घडली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खानापूर सरकारी इस्पितळात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *