Sunday , July 26 2026
Breaking News

घरफोड्याला अटक; 7 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. परशुराम इराप्पा दंडगल वय 32 रा. लक्ष्मी नगर जूने बेळगाव असे या घरफोडी करून चोरी करणाऱ्याचे नाव आहे.

बेळगाव शहर गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी स्नेहा. पी. व्ही., मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमणी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे प्रभारी पीआय जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केले.
माळमारुती पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षक-उपनिरीक्षकांसह, पोलस कर्मचारी एम. जी. कुरेर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, सी.आय. चिगरी, व्ही.एस. होसमणी, रवी बारीकार, एम.आर. मुजावर, तांत्रिक कर्मचारी रमेश अक्की, महादेव कशीद, ठसेतज्ञ तबरेज बागवान आणि पोलिस उपनिरीक्षक बाहुबली ए. यांचा या कारवाईत सहभाग होता. सदर पोलिस पथकाने केलेल्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त एस. सिद्धरामप्पा यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *