Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

तरूण पिढीने संविधानाचा आकांक्षा अंगीकारल्यास देशाचा विकास शक्य : शालिनी रजनीश

  बेळगाव : भारतीय नागरिकांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष यासह राज्यघटनेतील सर्व आकांक्षा तरुण पिढीने दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी व्यक्त केले. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने सुवर्णसौध सभागृहात आज बुधवारी भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या ६७ …

Read More »

विरोधकांच हट्ट; उत्तर कर्नाटकातील जनतेशी द्रोह

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका बेळगाव : हिवाळी अधिवेशन विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांसह उत्तर कर्नाटकातील समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्ष अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत आहेत. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्या ऐवजी विरोधी पक्ष …

Read More »

बेंगळूर नको, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकावर चर्चा करा

  लक्ष्मण सवदींची विधानसभेत मागणी बेळगाव : सोमवार दिनांक 4 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील समस्यांना वाचा फुटेल अशी आशा जनतेमधून व्यक्त केली जात असताना, दोन दिवसांच्या कामकाजात उत्तर कर्नाटक बेळगावमधील प्रश्नांवर कुठेही वाच्यता झालेली नाही. त्यातच गेल्या दोन दिवसात …

Read More »

पृथ्वीसिंग हल्ला प्रकरणी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

  बेळगाव : भाजपचे पदाधिकारी पृथ्वीसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणात बेळगाव ग्रामीणच्या आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी (MLC) यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पृथ्वीसिंग यांच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांकडून हा गुन्हा नोंदविला. आमदार चन्नराज यांच्यासह सुजय जाधव, सद्दाम व अन्य दोघांवर गुन्हा …

Read More »

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचे सुवर्णसौधसमोर आंदोलन

  बेळगाव (प्रतिनिधी) : विविध सरकारी व अनुदानित शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारच्या किमान वेतन कायद्याच्या वेळापत्रकात समावेश करावा आणि त्यांना वेतन द्यावे. या मागणीसाठी कर्नाटक राज्य संयुक्त अक्षरदासोह कामगार संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी सुवर्णसौध गार्डनजवळ जोरदार आंदोलन केले. आंदोलनात असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा शांता.ए म्हणाल्या की, आमच्या राज्यात एआययुटीयूसी योजनेत ४७,२५० मुख्य …

Read More »

वृद्धाश्रमात साजरा केला मीनाताई बेनके यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस!

  बेळगाव : मोठ्यांचे आशीर्वाद जीवनामध्ये महत्त्वाचे असतात त्यामुळे एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी आपल्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरा केला आणि येथील वृद्धांना जेवणाचे वाटप केले. अलिष्का अनिल बेनके हीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मीनाताई बेनके वृद्धाश्रमात दरवर्षी अन्नदान करतात. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी येथील वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना …

Read More »

रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी

  हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आलं असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्या प्रगतीत सेवकवर्गाचे महत्वपूर्ण योगदान : चेअरमन प्रकाश अष्टेकर

  येळ्ळूर : ‘नवहिंद सोसायटी’ने सहकार क्षेत्रात गेल्या 30 वर्षात उल्लेखनीय कामगिरी करून जनमाणसात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. या प्रगतीत सेवकवर्गाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन नवहिंद सोसायटीने आयोजित केलेल्या ‘स्टाफ काॅन्फरन्स’मध्ये केले. प्रारंभी सोसायटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वागतगीत सादर केल्यानंतर व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी प्रस्ताविकात संस्थेची माहिती दिली. …

Read More »

सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला संधी

  मंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती बेळगाव : शासनाने राज्यातील महत्त्वाच्या प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याची योजना आखली आहे. पीपीपी पद्धती नुसार हाती घेण्यात येणाऱ्या योजनांद्वारे पर्यटन स्थळांचा विकास करताना, सौंदत्ती रेणुका मंदिर परिसरातही विकासाची कामे त्याचबरोबर केबल कार प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे …

Read More »

राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार भारत पाटणकर यांना जाहीर

  बेळगाव : पत्रकारिता, शिक्षण, सहकार व समाज सुधारणा क्षेत्रात भरीव कार्य केलेले राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार कासेगाव, ता. वाळवा, जिल्हा सांगली येथील पुरोगामी विचारवंत, लेखक व कष्टकरी जनतेचे नेते काँम्रेड भारत पाटणकर यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत …

Read More »