Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे अनाथांना कपडे व दिवाळीच्या फराळाचे वाटप

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे दरवर्षी गरजू अनाथांना दिवाळीच्या फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरीब, अनाथ, उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी. त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समाजभान सतत जागृत राहावे यासाठी …

Read More »

एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार

  बेळगांव : एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत जवळपास त्यांना स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महिला विद्यालय येथील गिताबाई हेरेकर येथील सभागृहात ही भव्य रांगोळी स्पर्धा पार पडली. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमधील प्रथम क्रमांक साक्षी अनवेकर, द्वितीय क्रमांक प्रियांका …

Read More »

कर्नाटक राज्य सहकाररत्न पुरस्काराने युवा नेते उत्तम पाटील सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल कर्नाटक राज्य सहकार क्षेत्रातर्फे ‘सहकार रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोमवारी (ता.२०) विजापूर येथे झालेल्या सहकार सप्ताह समारोप कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब पाटील (दादा) यांना …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बुधवारी बैठक

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या बेळगावातील दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक येत्या बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली आहे. बेळगाव येथे येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र …

Read More »

खाऊ कट्ट्यातील दुकानांची पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून पाहणी

  बेळगाव : बेळगावातील गोवावेस बसवेश्वर सर्कलजवळ खाऊ कट्टा येथील दुकान वितरण आणि नाल्यालगतच्या इमारतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी खाऊ कट्टा येथील प्रत्येक दुकानाची पाहणी करून चौकशी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग बेंगळुरू दक्षिणचे मुख्य अभियंता दुर्गाप्पा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने आज …

Read More »

फेक न्यूज, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांचे निर्देश

  बेळगाव : सोशल मीडियावर खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्य किंवा व्हिडीओ टाकल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई करून योग्य ती कारवाई करावी, असे कडक निर्देश गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 20) शहरातील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली आणि सोशल नेटवर्क मॉनिटरिंग युनिट आणि कंट्रोल रूमची प्रत्यक्ष पाहणी करून …

Read More »

शेतकऱ्यांनी गडबड करून उसाला तोड देऊ नये

  राजू पोवार; ऊस दराबाबत जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल, बी- बियाणे, मजुरी, खतांचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. दरवर्षी कारखान्यांना जाणाऱ्या उसामुळे कारखानदार मोठे झाले असून शेतकरी रसा तळास जात आहे. खर्चाच्या तुलनेत ऊसाला दर देण्याची मागणी करूनही त्याकडे कारखान्यानी दुर्लक्ष केले …

Read More »

राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी चार वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. विशेष, म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून …

Read More »

192 तासांनंतरही बचावकार्य सुरुच, बोगद्याबाहेर नातेवाईकांचा आक्रोश

  उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद केलेले सिल्क्यरा येथून ड्रिलिंग रविवारी दुपारी 4 वाजता म्हणजेच 50 तासांनंतर पुन्हा सुरू झालं. टनलमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी येथून आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाइप ड्रिल करण्यात आला आहे. या दुर्घटनेला आठ …

Read More »

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता!

  अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये …

Read More »