बेळगांव : एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत जवळपास त्यांना स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महिला विद्यालय येथील गिताबाई हेरेकर येथील सभागृहात ही भव्य रांगोळी स्पर्धा पार पडली. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेमधील प्रथम क्रमांक साक्षी अनवेकर, द्वितीय क्रमांक प्रियांका सुतार, तृतीय क्रमांक मारुती आंबेवाडकर यांनी पटकाविला. या रांगोळी स्पर्धेला परीक्षक म्हणून रांगोळी कलाकार अजित औरवाडकर आणि रांगोळी कलाकार व चित्रकार जयवंत सुतार हे लाभले.
यावेळी या रांगोळी बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दलित समाजाचे नेते मल्लेश अण्णा चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे, महांतेश तलवार, दीपक सुतार उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर पाटील व पुंडलिक पाटील यांनी केले. तसेच या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अक्षता नाईक, शंकर अष्टेकर, प्रज्ञा शिंदे, माया बडगेर, कमल कोलंबस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.