Saturday , July 27 2024
Breaking News

मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे अनाथांना कपडे व दिवाळीच्या फराळाचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे दरवर्षी गरजू अनाथांना दिवाळीच्या फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरीब, अनाथ, उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी. त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समाजभान सतत जागृत राहावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील फराळ व चांगल्या प्रकारचे कपडे शाळेत जमा करून हे कपडे व फराळ ज्योतीनगर गणेशपुर येथील विद्यार्थ्यांना व इव्हान लोमॅक्स यांच्या होम फॉर होमलेस अनाथालयातील वृद्धांना भेट दिले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्योतीनगरच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद ही घेतला व त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालविला. यावेळी ज्योतीनगर शाळेतील मुख्याध्यापक मासेकर सर, शिंदोळकर मॅडम उपस्थित होते. तसेच मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षक शितल बडमंजी, मंजुषा पाटील, अश्विनी हलगेकर, सुनीता पाटील व शाळेचा माजी विद्यार्थी सुरज हत्तलगे उपस्थित होते. या उपक्रमाची ओळख प्रसाद सावंत यांनी करून दिली. या उपक्रमाबद्दल ज्योतीनगर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच इव्हॉन लोमेक्स आश्रमातील गरजू व अनाथांनी समाधान व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *