Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे “व्होट चोर गद्दी छोड” अभियानाला सुरुवात; तालुक्यात राबविली सह्यांची मोहीम!

  खानापूर : एकीकडे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे तर निवडणूक आयोग संविधानाप्रमाणे काम करत नसून व्होट चोरांना मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासहित केला असून देशातील निवडणूक आयोग भाजपाचा बटीक असल्यासारखे वागत असल्याचा आरोप देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय …

Read More »

निपाणी ब्लॉक काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्षपदी अस्लम शिकलगार यांची निवड

  निपाणी (वार्ता) : पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अस्लम शिकलगार यांची निपाणी ब्लॉक अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येथील मराठा मंडळमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शिकलगार यांचा मान्यवरांच्या …

Read More »

खानापूर तालुका भूविकास बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची 57 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील होते. सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. चेअरमन मुरलीधर पाटील यांनी भागधारक शेतकऱ्यांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बँकेचे सुमारे 97.54 लाख रुपये भाग भांडवल असून यावर्षीची वार्षिक ऊलाढाल …

Read More »

युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत …

Read More »

चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदून गटारी भरल्या मातीने; नागरिक डासांनी हैराण

  बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने वडगाव चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदण्यात आली. मात्र कुपनलिका खोदून या ठिकाणची माती गटारीतच पडून राहिली आहे. त्यामुळे गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे तक्रारही नोंदवली. दरम्यान वीस दिवस उलटूनही गटारीतील …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी उद्याच नवीन जिल्ह्याची घोषणा करावी : खास. इराण्णा कडाडी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शनिवारी बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवीन जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. अनेकदा निवेदन …

Read More »

पीक नुकसानीची भाजप नेत्यांनी केली पाहणी

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी भागात मुसळधार पावसामुळे गाजर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. “पिकांच्या नुकसानीमुळे आम्ही मोठ्या अडचणीत आहोत, मात्र आमची व्यथा ऐकण्यासाठी मंत्री किंवा …

Read More »

चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर

  चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदिवडेकर उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून,संस्थेच्या पुढील सन 2025 ते 2030 या कालावधी करिता नूतन कार्यकारिणी मंडळाची बहुमताने व …

Read More »

सेक्स टॉय, पॉर्न सीडी, मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स…; स्वामी चैतन्यानंदचे धक्कादायक कारनामे

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चैतन्यानंदने १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असून चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या चैतन्यानंदचे अनेक धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. सेक्स टॉय, पॉर्न सीडी …

Read More »

२६/११ मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या एनएसजी कमांडोला २०० किलो गांजासह एटीएसकडून अटक

  मुंबई : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत …

Read More »