Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्र्यांनी उद्याच नवीन जिल्ह्याची घोषणा करावी : खास. इराण्णा कडाडी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शनिवारी बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवीन जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.

शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. अनेकदा निवेदन दिले असूनही तुम्ही ते कचऱ्याच्या पेटीत टाकले आहे. तुम्ही बेळगाव जिल्ह्यात आला असल्याने नवीन जिल्हा घोषित करावा, असा त्यांनी आग्रह केला.

पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील जनतेला एकही नया पैसा न देता उद्या बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मी स्वागत करतो. भीषण पावसामुळे लोक आणि शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री बेळगावात आल्यावर मंत्री तुमच्या लक्षात आणून भरपाई जारी करतील, या विश्वासाने मी त्यांचे स्वागत करतो, असे इराण्णा कडाडी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *