Sunday , September 20 2026
Breaking News

चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदून गटारी भरल्या मातीने; नागरिक डासांनी हैराण

Spread the love

 

बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने वडगाव चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदण्यात आली. मात्र कुपनलिका खोदून या ठिकाणची माती गटारीतच पडून राहिली आहे. त्यामुळे गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे तक्रारही नोंदवली. दरम्यान वीस दिवस उलटूनही गटारीतील माती काढण्यात आलेली नाही. याउलट पावसाचे तसेच अन्य सांडपाण्याने गटारी तुंबलेल्या आहेत. तुंबलेल्या गटारीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांना अगोदरच साथीच्या रोगांनी त्रस्त केले आहे. त्यात मातीने भरलेल्या गटारीतून दुर्गंधी सुटली आहे. डासांमुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. या संदर्भात महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन गटारीतील माती लवकरात लवकर काढावी. गटारीतून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा आणि परिसर स्वच्छ राहावा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *