Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील माध्यमिक विद्यालयाचे लिपिक व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी अध्यक्षस्थानी होते. विश्व भारत सेवा समितीच्या कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे समर्पक निधी : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे समर्पक निधी आहे. बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिक नोकर भरतीसाठी आम्ही यापूर्वीच समितीची बैठक घेतली आहे. 359 पौरकार्मिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिकांच्या भरतीसाठी …

Read More »

जिल्हा पालक सचिव अंजुम परवेज यांनी घेतली जिल्हा प्रगती आढावा बैठक

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असल्याने शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार आणि नरेगा योजनेंतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव डॉ. अंजुम परवेज …

Read More »

खानापूरात किराणा दुकानावर दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न

  खानापूर : खानापूर शहरातील महांतेश सोनोळी यांच्या मालकीच्या अमय ट्रेडर्स या दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पहिल्या दुकानाचे कुलूप तोडण्यात यश न आल्याने त्यांनी शेजारील किराणा दुकानाचे कुलूप तोडले. मात्र दुकानात ठेवलेली केवळ 50,100 रुपयांची चिल्लर सापडल्याने ते परत गेले. तात्काळ खानापूर पोलीस …

Read More »

निपाणीत विद्यार्थ्यांचा डेंगी सदृश आजाराने मृत्यू

  निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश्य आजाराने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.९) निपाणी येथे घडली आहे. येथील साखरवाडीतील व सध्या सावंत कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या हर्ष सचिन कदम (वय १२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणी शहर आणि उपयोगात खळबळ उडाली आहे. हर्ष कदम हा पाचवीच्या वर्गात शिकत …

Read More »

सरस्वती महिला मंडळचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : अनंतशयन गल्ली येथील सरस्वती महिला मंडळाच्या पहिल्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या. त्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील सर्व महिलांनी एकत्रित येत दांडिया, गरबा, हादगा यासह अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी …

Read More »

पारदर्शी कारभारामुळेच ‘अरिहंत’चा महाराष्ट्रात प्रवेश

  आमदार सतेज पाटील; अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखालील श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी संस्था ही कर्नाटक राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवली आहे. सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिलेली ही संस्था मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केली आहे. कोल्हापूर येथे …

Read More »

निपाणी बाजारपेठेत दीपचैतन्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

  निपाणी (वार्ता) : दिवाळी सणाला गुरुवारपासून (ता.९) वसुबारसने प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान या सणामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. निपाणी परिसरावर दुष्काळाचे सावट असले तरी वर्षभरातील आनंदाचा सण म्हणून शहर आणि ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी …

Read More »

अरिहंत संस्थेच्या अक्कोळ शाखेचा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या अक्कोळ शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय हतगीणे हे कुडित्रे येथील डी. सी. नरके जुनियर कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल, ग्राम पंचायत सदस्य दीपक कोळी यांना राष्ट्रीय आदर्श …

Read More »

‘अंकुरम’च्या विद्यार्थ्यांनी बनविले दिवाळीचे साहित्य

  आठवडी बाजारात विक्री; पणत्या आकाश कंदीलांचा समावेश निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः दिवाळीनिमित्त आकर्षक सजावटीचे साहित्य, सुगंधित उटणे, पणत्या आणि इतर वस्तू बनवल्या होत्या. त्या सर्व वस्तू दिवाळी निमित्ताने येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात स्टॉल मांडून त्यांची विक्री केली. ‘कमवा आणि शिका’ उपक्रमांतर्गत …

Read More »