Sunday , July 26 2026
Breaking News

व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Spread the love

बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील माध्यमिक विद्यालयाचे लिपिक व्ही. एस. खवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी अध्यक्षस्थानी होते. विश्व भारत सेवा समितीच्या कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यार्थिनींच्या ईशस्तवनानंतर सेवानिवृत्त लिपिक व्ही. एस. खवरे व त्यांच्या पत्नी सौ. कांचन खवरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक हुलगबाळी व मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते खवरे व त्यांच्या पत्नींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात खवरे यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. श्री खवरे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जी. एस. खांबले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सौ जी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, एस. आय. माडगूळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास बी. एस. पाटील, शिक्षक वर्ग व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *