Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

भ्रष्टाचार, लाचेची माहिती द्या : उपनिरीक्षक अजीज कलादगी

  निपाणीत नागरिकांमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : सरकारी कार्यालयासह इतर ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी भ्रष्टाचारासह लाच प्रकरणे वाढत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी लोकायुक्त आणि पोलीस विभागातर्फे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. याशिवाय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्यास तात्काळ त्याची माहिती लोकायुक्तांना देऊन सहकार करावे, …

Read More »

जैनापुर अरिहंत साखर कारखान्याकडून ३ हजार रुपये दराची घोषणा

  निपाणी (वार्ता) : जैनापुर येथील अरिहंतहा साखर कारखाना सहकार महर्षी रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे दर देण्याचे निश्चित केले आहे. गळीत हंगामाच्या एफआरपीनुसार ऊस तोडणी वाहतूक …

Read More »

युवतींची बदनामी करणाऱ्या तरुणास अखेर अटक

  खानापूर : मुलींच्या व महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून इंस्टाग्रामवर अपलोड करून अश्लील कृत्य व बदनामी करणारा लोकोळी गावातील आरोपी मंथन दशरथ पाटील याला ताबडतोब अटक करून त्याला कारागृहात पाठविण्यात यावेत व त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी लोकोळी गावातील 150 पेक्षा जास्त युवती, …

Read More »

कुरली कुस्तीत सांगलीचा उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजयी

  हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजन : कुस्ती शौकीनांची उपस्थिती कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथे हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा उमेश चव्हाण व जाधव आखाडा इस्लामपूर येथील अजय निकम यांच्यात उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजय मिळवला. पैलवान उमेश चव्हाण याला अरिहंत उद्योग समुहाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, …

Read More »

सिद्धरामय्यांच्या ‘त्या’ विधानाने कॉंग्रेसमध्येच खळबळ

  मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत उलट-सुलट चर्चा बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी केवळ सहा महिने पूर्ण केले असताना अचानक पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असे विधान …

Read More »

दिवाळीत हिरव्या फटाक्यानाच परवानगी

  रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके वाजविण्याच्या सूचना बंगळूर : दिव्यांचा सण दीपावली जवळ येत असताना, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू करत आहे. रात्री ८ ते १० यावेळेतच हिरवे फटाकेच वाजवावेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात ११ ते १५ …

Read More »

ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत केदारनाथमध्ये सीमावासीयांची घोषणाबाजी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

  बद्रीनाथ- उत्तराखंड : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. तिथे आज सकाळी ते केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासमोर बेळगावमधल्या सीमाभागातील सीमावासीयांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा सीमावासीयांनी केली. तसंच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत …

Read More »

भूकंपामुळे नेपाळ उध्वस्त, आतापर्यंत 72 जणांनी गमावले प्राण

  नेपाळ : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात …

Read More »

कॅन्डल मोर्चा स्थगित

  बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे -पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डल मोर्चा घेण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डल मोर्चा काही काळ स्थगित ठेवून …

Read More »

मार्कंडेय साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ

  बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा विधीवत पूजनाने आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मार्कंडेय साखर कारखाना स्थळी आज सकाळी कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे विधिवत पूजन करून ऊस गाळपासाठी टाकण्याद्वारे गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सवाद्य पार पडलेल्या …

Read More »