Wednesday , April 22 2026
Breaking News

जैनापुर अरिहंत साखर कारखान्याकडून ३ हजार रुपये दराची घोषणा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जैनापुर येथील अरिहंतहा साखर कारखाना सहकार महर्षी रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे दर देण्याचे निश्चित केले आहे. गळीत हंगामाच्या एफआरपीनुसार ऊस तोडणी वाहतूक खर्चासह ३६०१ इतका दर होतो. म्हणून ३ हजार रुपये प्रमाणे दर देण्याची घोषणा केली आहे. असून पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी दरवर्षी कारखान्यावर विश्वास ठेवून आपल्याच कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सभासदासाठी कारखानातर्फे अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे यावर्षीही ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस अरिहंत साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *