Monday , September 21 2026
Breaking News

दिवाळीत हिरव्या फटाक्यानाच परवानगी

Spread the love

 

रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके वाजविण्याच्या सूचना

बंगळूर : दिव्यांचा सण दीपावली जवळ येत असताना, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू करत आहे. रात्री ८ ते १० यावेळेतच हिरवे फटाकेच वाजवावेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण साजरा करण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत . त्यानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवता येतील आणि फक्त हिरवे फटाके लावावेत.
फटाक्यांचा वापरावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिले असून अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर गांभीर्याने तपासणी करावी. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी हिरव्या फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाके विकत असल्यास संपूर्ण गोदाम जप्त करण्यात यावे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत . हिरवे फटाके क्यूआर कोड चिन्ह नसलेले फटाके जप्त करावेत. उत्सवात फक्त हिरवे फटाके वापरावेत.
त्यांचा वापर करताना कोणत्याही पशू, पक्षी, लहान मुले, वृद्ध यांना त्रास न होता त्यांचा वापर करावा. पाच ते २० नोव्हेंबर या कालावधीत सतत वायू प्रदूषण चाचणी करावी. सर्व जिल्हा केंद्राची मोजमाप करून चाचणी करावी. राज्याबाहेरील अनधिकृत फटाक्यांना बंदी आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमार्फत नियमांचे पालन करण्याबाबत कार्यवाही करावी.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि निषिद्ध ठिकाणी फटाके फोडण्यास परवानगी नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागांनी याचे सक्तीने पालन करावे, असे मंडळाने म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *