Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात भ्रष्ट अधिकार्‍यांवर लोकायुक्त छापा

  बेळगाव : भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात लोकायुक्त अधिकार्‍यांनी आज सकाळी सकाळी दोन अधिकार्‍यांवर छापा टाकला. बेळगाव पंचायत राज विभाग एईई एम. एस. बिरादार यांच्या घरावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी विश्वेश्वरय्या नगरमधील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर …

Read More »

भारताच्या विजयी ‘षटकार’, इंग्‍लंडचा धुव्‍वा उडवत भारताचा सलग सहावा विजय

  लखनऊ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाने घोडदौड कायम राखताना विजयी षटकार खेचला. २२९ धावांचा बचाव भारतीय संघ करेल की नाही अशी शंका मनात आली होती, पण मोहम्मद शमीने (४-२२) पुन्हा एकदा कमाल केली. जसप्रीत बुमराह ( ३-३२), कुलदीप यादव (२-२४) आणि रवींद्र जडेजाची (१-१६) त्याला साथ …

Read More »

आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी

  आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 50 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

  खानापूर : संपूर्ण भारत देशामध्ये 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. या प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा मराठी भाषिकांचा भूभाग केंद्र सरकारने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर घोर अन्याय केला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून एक नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जातो त्या दिवसापासून आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिक एक नोव्हेंबर …

Read More »

शाळा सुधारणा समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : शाळा सुधारणा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना उद्या सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० निवेदन देण्यात येणार असून शाळेतील विविध समस्या त्वरित सोडवाव्यात आणि शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. सरकारी शाळेमध्ये …

Read More »

जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा विषयावर शिबिराचे आयोजन

  डॉ. माधव प्रभू यांनी केले महिला भगिनींना मार्गदर्शन बेळगाव (प्रतिनिधी) : जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने महिलांमधील उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव येथील जय जवान हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केएलई इस्पितळाचे डॉक्टर आणि प्राध्यापक माधव प्रभू उपस्थित होते. इंडियन मेडिकल …

Read More »

1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे खानापूरात जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य …

Read More »

निपाणीत राजमणी चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे राजमणी चॅम्पियन्स ट्रॉफी या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (ता.२९) झाले. या स्पर्धा ७ नोव्हेंबर पर्यंत येथील श्री समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर होत आहेत. ओंकार शिंदे यांनी स्वागत केले. प्रशिक्षक सचिन फुटाणकर यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक रोहन साळवे, डॉ. एम. ए. शहा, प्रकाश …

Read More »

निपाणी उरूसातील मानाच्या फकीरांची रवानगी

  कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान ‌अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी रविवारी (ता.२९) परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी …

Read More »

माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत

  बेळगाव : माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. …

Read More »