Wednesday , April 22 2026
Breaking News

जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा विषयावर शिबिराचे आयोजन

Spread the love

 

डॉ. माधव प्रभू यांनी केले महिला भगिनींना मार्गदर्शन

बेळगाव (प्रतिनिधी) : जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने महिलांमधील उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव येथील जय जवान हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केएलई इस्पितळाचे डॉक्टर आणि प्राध्यापक माधव प्रभू उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉक्टर सुचित्रा लाटकर, सचिव डॉक्टर अरुणा महेंद्रकर, डॉक्टर संगीता, डॉक्टर गिजरे, डॉक्टर उमदी आदी याप्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

प्रारंभी जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने एना डिसोजा यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. फाउंडेशनच्या अध्यक्षा लीना अँथोनी वेगस यांनी उपस्थित पाहुण्यांना भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी, डॉक्टर माधव प्रभू यांनी उपस्थित महिलांना उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि रक्तशर्करा (ब्लड शुगर) या विषयावर मार्गदर्शन केले. सकस व पोषक आहार, योग्य विहार आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष झाल्याने रक्तदाब आणि रक्त शर्करा या व्याधी वाढत असून यामुळे हृदयविकार रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तशर्करा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांनी धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची जागरुकतेने काळजी घ्यावी. योग्य आहार आणि योग्य व्यायाम याद्वारे उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा या व्याधींना चार हात दूर ठेवून महिलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ रहावे असा सल्ला डॉक्टर माधव प्रभू यांनी यावेळी बोलताना दिला.

याप्रसंगी डॉक्टर सुचित्रा लाटकर, डॉक्टर अरुणा महेंद्रकर आणि डॉक्टर संगीता यांनीही, ‘ महिलांनी आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी ‘, यासंदर्भात मार्गदर्शन केले.
लीना अँथोनी वेगस यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला जॉननाथन फाउंडेशनच्या भक्ती शिंदे, विरोनिका रोड्रिग्ज, शारदा दिवटे, अनिता डिसोजा, क्लारा स्वामी, जेनिफर डिसोजा, फिलू पीआस, लेविना, सॅव्हीना बेल्ला, मिलाग्रीन वेगस यासह फाउंडेशनच्या सदस्या तसेच भारत माता महिला मंडळाच्या सदस्या आणि परिसरातील इतर महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *